अखेर द्वारली गावातील रस्त्याच्या डांबरी करणाला सुरुवात


■नगरसेवक कुणाल पाटील यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर काम सुरु द्वारली गावच्या रस्त्याचे पाच वर्षानंतर सुरु झाले डांबरीकरण...


कल्याण , कुणाल  म्हात्रे   :   कल्याण पूर्वेतील अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या कल्याण मलंगगड रोड वरील द्वारली गावाजवळ खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. सततचे रस्त्यावर होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी सह परिसरातील नागरिकांना धुळीचे देखील त्रास होत होते. गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा करून देखील महापालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने माजी स्थायी समिती सदस्य तथा अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी रस्ता रोकोचा इशारा दिला होता. अखेर कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रस्त्याच्या कामाला तातडीने सुरुवात करण्याचे आदेश दिले होते. अखेर या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. 


कल्याण पूर्वेतील द्वारली गावच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. गेल्या कित्तेक वर्षांपासून नगरसेवक कुणाल पाटील हे याबाबत पाठपुरावा हे करत होते. मात्र पाठपुरावा आणि पत्रव्यव्हार करून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने नगरसेवक कुणाल पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र याची तातडीने दखल प्रशासनाने घेत रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात केली आहे.


ग्रामीण भागात ध्या लग्नसराईचे धुम सुरु झाली आहे. तर अनेक कामगार नवी मुंबईपनवेल, अंबरनाथ अश्या औद्योगिक क्षेत्रात कामासाठी जात असताना त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. अखेर सर्वसामान्य नागरिकांच्यावाहनचालकांच्या तक्रारी कुणाल पाटील यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी तात्काळ याची दखल घेत रस्त्याची पाहणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रस्त्याच्या कामाला तातडीने सुरवात केली आहे.

Post a Comment

0 Comments