कोनगांव ग्राम पंचायतीने जन आंदोलनाचा ईशारा देताच एम,आय,डीसी विभागा कडून पाणी पुरवठा सुरळीत
भिवंडी दि.६ (प्रतिनिधी  ) गेल्या वर्षभरापासून कोनगावला एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाकडून अनियमित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.त्यातच कोविडच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावाला सुरळीत पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे.मात्र एमआयडीसीकडून पाणी पुरवठा अनियमित होत असल्याकारणाने पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यातच उन्हाच्या झळा अधिक तीव्रगतीने वाढल्या असून पाणी पुरवठा अनियमित आणि कमी दाबाने होत असल्याने ग्रामस्थांच्या तक्रारी आणि मोर्चे ग्रामपंचायतीकडे  वाढत आहेत.


          या पाणी टंचाई विरोधात वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा अंतर्गत पाणीपुरवठा आणि कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणी पुरवठा होतो. याकडे एमआयडीसी नेहमीच दुर्लक्ष करीत आहे.गेल्या अनेक महिन्यापासून मेन लाईनचे मिटर सुद्धा नादुरुस्त आहे.त्यामुळे किती पाणी पुरवठा होतो ? याचे प्रमाण देखील सांगता येत नाही.याबाबत अनेकवेळा पत्र व्यवहार करण्यात आले.पण कोणतीही कार्यवाही झालेली नाही.तरी कोनगांव क्षेत्राच्या पाणीपुरवठ्यासाठी तात्काळ नियोजन करून पाणी पुरवठा समस्या लवकर सोडवावी अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल असा ईशारा सरपंच डॉ. रुपाली अमोल कराळे यांनी एमआयडीसी पाणी पुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता नरेश वाळके यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

          
         एमआयडीसी प्रशासनाने तक्रारीची तात्काळ दखल न घेतल्यास ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली  सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, कोनगांव ग्रामस्थ भिवंडी कल्याण रोडवर रस्ता रोको जनआंदोलन करतील असा इशारा देखील देण्यात आला आहे.यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रशासन जबाबदार असेल असेही निवेदनात म्हटले आहे.जनआंदोलनाची तीव्र भावना लक्षात घेऊन एमआयडीसी पाणीपुरवठा डोंबिवली विभागाचे सहाय्यक अभियंता नरेश वाळके यांनी येत्या आठ दिवसात पाणी पुरवठ्याबाबत सर्व समस्या सोडवून कोनगावासाठी नियमित असलेला पाणीपुरवठा (१.५ MLT) सुरळीतपणे करून मीटर बसविण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.


      तसेेेच आंदोलन स्थगित करावे यासाठी  दुपारी ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत असलेली पाणी पुरवठ्याची वेळ २ तासांनी वाढवून दुपारी ३ ते रात्री १ वाजेपर्यंत वाढवून पाण्याचा दाबही तात्काळ वाढवण्यात आला आहे.एमआयडीसी सहाय्यक अभियंता यांची भेट घेण्यासाठी सरपंच डॉ.रुपाली अमोल कराळे, उपसरपंच कृतिका प्रमोद पाटील, प्रमोद हनुमान पाटील, डॉ.अमोल कराळे ,सदस्य अशोक बळीराम म्हात्रे , हनुमान म्हात्रे मा.उपसरपंच पांडुरंग कराळे , भाजप कार्यकर्ते विनोद पाटील, गोरक्ष भगत आदी पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments