कल्याण डोंबिवलीत २४४ रुग्ण
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज २४४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एकही मृत्यू झाला नाही.      आजच्या या २४४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६३,९३४ झाली आहे. यामध्ये १८८८ रुग्ण उपचार घेत असून ६०,८७२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २४४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२०,  कल्याण प – ७१डोंबिवली पूर्व १०५डोंबिवली प – ३४मांडा टिटवाळा  ११तर मोहने   येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.


Post a Comment

0 Comments