"ड" प्रभाग क्षेत्रात अनाधिकृत ११ हातगाड्या आणि १ अनाधिकृत टपरीवर कारवाई
कल्याण , कुणाल  म्हात्रे   : "ड" प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने रस्त्यालगत असलेल्या अनाधिकृत हातगाड्याअनाधिकृत टपर्यांवर शनिवारी धडक कारवाईचा बडगा उचलित अनाधिकृत हातगाड्याअनाधिकृत टपर्या कोरोना नियमावलीच्या पार्श्वभूमीवर पालन न करता सुरु असलेल्या अनाधिकृत हागाड्या, टपार्यावर हातोडा चालवित भुईसपाट केल्या. 


 कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत गेल्या तीन दिवसात १८०० च्यावर कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनली असल्याने पालिका प्रशासनाने सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यत दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. तर सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत फेरीवालेखादय आणि पेयाच्या हातगाड्या यांना विक्रीस परवानगी होती. मात्र परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून प्रशासनाने दर शनिवारी आणि रविवारी खादय आणि पेयाच्या हातगाड्याना बंदी घातली आहे.


अशातच काही अनाधिकृत हातगाड्याटपार्या सुरु असल्याचे प्रभागक्षेत्र आधिकारी ड प्रभाग सुधीर मोकल यांच्या पथकाच्या निर्दशानास आल्याने त्यांनी अनाधिकृत हातगाड्याटपर्या चालकास बंद करण्याबाबत समज देऊन सांगितले. परंतु अनाधिकृत हातगाड्याटपार्या चालकांनी अनाधिकृत हातगाड्याटपर्या सुरु ठेवणाऱ्या ११ अनाधिकृत हागाड्या १ अनाधिकृत,टपरी वर कारवाईचा बडगा उचलला आहे.

Post a Comment

0 Comments