कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ६७ हजारांचा टप्पा २३६ नवीन रुग्ण तर ३ मृत्यू




कल्याण , कुणाल म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ६७ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज २३६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत २०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज तीन मृत्यू झाले आहेत.




      आजच्या या २३६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६,१६२ झाली आहे. यामध्ये ३०६८ रुग्ण उपचार घेत असून ६,९०८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११८६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २३६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-३७,  कल्याण प – ६०डोंबिवली पूर्व १०१डोंबिवली प – २३मांडा टिटवाळा – ११तर मोहना येथील ४ रुग्णांचा समावेश आहे.


Post a Comment

0 Comments