गुरवली येथील जमीन प्रकरणी चौकशीसाठी ईडी ची टीम कल्याणात

      

 


                                                             

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : टिटवाळा नजीकच्या गुरवली येथील जमीनीच्या व्यवहारा प्रकरणी ईडीची टीम कल्याण येथील बिल्डर योगेश देशमुख यांच्या घरी पोहचली. ईडीची टीम घरी दाखल होताच योगेश देशमुख यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशमुख कुटुंबियांचा आरोप आहे की,  प्रताप सरनाईक सोबत जमीनीचा व्यवहार पूर्णत्वास आलेला नाही. तरी पण आम्हाला त्रास देऊन घाणेरडे राजकारण केले जात आहे.


टिटवाळा येथील गुरुवली परिसरात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ७८ एकर जागा असल्याचा दावा करीत ही जागा ईडीकडून जप्त करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. प्रताप सरनाईक यांची ईडी कडून चौकशी सुरु आहे. प्रताप सरनाईक यांनी ही जागा योगश देशमुख या बिल्डरकडून घेतली असल्याची बोलले जात आहे. आज सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास आठ ते दहा आधिकार्याची एक टीम कल्याण पश्चीमेतील गोदरेज हिल परिसरातील विराजमान बंगल्यात दाखल झाली. हा बंगला योगेश देशमुख यांचा आहे. सुरुवातील ईडी अधिकार्यासबोत देशमुख यांच्या पत्नीचा वाद झाला. याच दरम्यान योगेश देशमुख यांची तब्येत बिघडली. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


दरम्यान सदर जमीन प्रकरणी घाणेरडे राजकारण सुरु आहे. त्यांना हवी तशी माहिती देण्यासाठी आपल्या वर दबाव टाकला जात असल्याचा आरोप देशमुख यांच्या पत्नीने केला आहे.

Post a Comment

0 Comments