अंध सिद्धी दळवीला जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदक

 डोंबिवली  (प्रतिनिधी) नुकत्याच बंगलोर येथे झालेल्या विसाव्या राष्ट्रीय पॅरा (अपंगांसाठी) जलतरण स्पर्धेत ५० मीटर फ्री स्टाईल व ५०  मीटर बॅक स्ट्रोक या दोन्ही प्रकारात सुवर्ण पदक पटकाविनाऱ्या कल्याणमधील जलतरणपट्ट सिध्दी  दळवी अंध असून हिने सर्वत्र कौतुक होत आहे. दोन्ही स्पर्धेत सिध्दीने वेळेच्या बाबतीत स्वत: चाच रेकार्ड मोडला आहे.ही स्पर्धा २०  ते २२ मार्च या कालवधीत पार पडली.

      

     कल्याणच्या सरस्वती मंदीर या शाळेत सिध्दी सातवीत शिकत आहे. सिद्धीला सातत्याने सर्दीचा त्रस होत असे. तिच्या पालकांना डॉक्टरांनी तिला जलतरणचे प्रशिक्षण देण्याचा सल्ला दिला. सिद्धीचे जलतरणामुळे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होणार असल्याने तिच्या पालकांनी तिला प्रशिक्षणासाठी पाठविण्यास सुरुवात केली. आधारवाडी येथील जलतरण तलावात ती सरावासाठी जाऊ लागली. दोन-तीन महिन्यात रिध्दीची चमकदार कामगिरी दिसू लागली.


           या मुलांच्या वेगळ्य़ा स्पर्धा होतात हे रिध्दीच्या पालकांना समजले.मग तिची स्पर्धेच्या दृष्टीने तयारी सुरू झाली. तिच्या पालकांच्या जलतरणमध्ये अजून प्रयत्न केल्यास ती चांगले यश मिळावू शकते हे लक्षात आले. त्यामुळे सिद्धीचे वडील दररोज सकाळी तिच्याकडून शारीरिक व्यायाम करून घेतात. त्यानंतर तिची आई जलतरणच्या प्रशिक्षणासाठी तिला घेऊन जाते. वयाच्या आठव्या वर्षी सिद्धीने जलतरणच्या स्पर्धेत उतरण्यास सुरूवात केली.त्यात तिने अनेक सुवर्ण व रजत पदक पटकविले.

Post a Comment

0 Comments