कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ७४ हजारांचा टप्पा ८२५ नवीन रुग्ण तर ३ मृत्यू
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ७४ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज ८२५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ३९२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज तीन मृत्यू झाले आहे. 

      आजच्या या ८२५ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ७४,६३३ झाली आहे. यामध्ये ७१०१ रुग्ण उपचार घेत असून ६६,३२३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १२०९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ८२५ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१३६कल्याण प – २५५डोंबिवली पूर्व २८६डोंबिवली प – ८७मांडा टिटवाळा – २६ मोहना – २९, तर पिसवली येथील ६ रुग्णांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments