Header AD

महिला दिना निमित्त मुंबई ते खंडाळ्या दरम्यान ऑल - वुमेन ईव्ही रॅलीचे आयोजन


■मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील एचपीसीएलच्या नवीन चार्जिंग स्टेशनला दिली भेट ...


मुंबई, ८ मार्च २०२१ : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एमजी मोटर इंडियाने मुंबई ते खंडाळ्यादरम्यान ऑल-वुमेन ईव्ही रॅली काढली. ‘इलेक्ट्रिफाइंग वूमेन्स ड्राइव्ह’ उपक्रमाचा हा एक भाग असून यात २१ झेडएस ईव्ही ड्रायव्हर्सनी सहभाग नोंदवला.


ईव्ही रॅलीची सुरुवात एमजीच्या मुंबईतील पश्चिमी भागात स्थित जेव्हीएलआर जवळील डिलरशिप केंद्रापासून झाली. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वरील एचपीसीएलच्या नव्याने उद्घाटन झालेल्या चार्जिंग स्टेशनवर मधला स्टॉप घेत ही रॅली खंडाळ्यातील ड्यूक रिट्रीटकडे रवाना झाली. एचपीसीएलने नुकतेच साजगाव येथील पेट्रोल पंपावर चार्जिंग सोल्यूशन प्रोव्हायडर मॅजेंटा चार्ज ग्रिड यांच्यासोबत चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन केले.


झेडएस ईव्ही २०२१ आता नव्या एचटी बॅटरीसह प्रमाणित ४१९ किमीच्या रेंजसह येते. वाहन निर्माता कंपनीने ५ व्या चार्जिंग नेटवर्कच्या माध्यमातून देशातील चार्जिंग इकोसिस्टिमचा विस्तार सुरु ठेवला आहे. कार निर्माता कंपनीने डीसी फास्ट-चार्जिंग स्टेशनसाठी टाटा पॉवर आणि फोर्टम चार्ज, घर व ऑफिसच्या चार्जिंगसाठी ई-चार्ज बेज तसेच डेल्टा कंपनी आणि बॅटरीजच्या शाश्वत पुनर्वापरासाठी एक्झिकॉम आणि उमीकोअर कंपनी इत्यादींसह करार केला आहे.


एमजीच्या चार प्रमुख ब्रँड पिलर्समध्ये समाज व विविधता यांचाही समावेश आहे. याच धर्तीवर वाहन निर्माता कंपनीने गुजरातच्या वडोदरा येथील हलोलच्या उत्पादन प्रकल्पात सर्व महिला कर्मचाऱ्यांच्या पुढाकारने ५०,००० व्या एमजी हेक्टरची निर्मिती केली. विविध विभाग प्रमुख आणि ब्लू-कॉलर प्रोफेशनलसह एमजीच्या संपूर्ण बोर्ड श्रमशक्तीत ३३% महिलांची भागीदारी आहे.

महिला दिना निमित्त मुंबई ते खंडाळ्या दरम्यान ऑल - वुमेन ईव्ही रॅलीचे आयोजन महिला दिना निमित्त मुंबई ते खंडाळ्या दरम्यान ऑल - वुमेन ईव्ही रॅलीचे आयोजन Reviewed by News1 Marathi on March 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads