कर्तुत्ववान महिलांचा हिरकणी गौरव पुरस्काराने सन्मान आरएसपी अधिकारी युनिटचा उपक्रम

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  जागतिक महिला दिनानिमित्त आरएसपी अधिकारी युनिटच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली परिसरातील कोरोना सारख्या आपत्कालीन परिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला सावित्रीच्या लेकींच्या हिरकणी गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शनिवारी कल्याण पश्चिमेतील स्वामी नारायण हॉल याठिकाणी हा सोहळा पार पडला.


याप्रसंगी पीएसआय मंजूषा शेलार यांनी आरएसपी अधिकाऱ्यांनी देखील कोरोना काळात पोलीस प्रशासनालाच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाला मदत केली आहे. आरएसपी युनिटचे कार्य खूप उल्लेखनीय आहे या शब्दात गौरव केला. हिरकणी गौरव पुरस्कारासाठी पोलीस विभागवाहतूक विभाग,आरोग्य विभागशिक्षण विभागपरिवहन विभागसफाई कामगारखेळाडूसमाजसेविकानगरसेविकाबँक महिला अधिकारीकलाकारपत्रकार अशा प्रत्येक विभागातील कर्तृत्ववान ५६ महिलांना हिरकणी गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सन्मानचिन्ह, सन्मान पत्र,  भेटवस्तू, साडी देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे व सत्कारार्थी हिरकणी यांचे कमांडर मणिलाल शिंपी यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments