एमजी मोटर इंडियाचा आयआयटी दिल्ली सोबत करार


शहरात वापरातील कनेक्टेड, इलेक्ट्रिक आणि ऑटोनॉमस मोबिलिटीवर भर देण्यासाठी संशोधन ..

 

मुंबई, १५ मार्च २०२१ : एमजी मोटर इंडियाने इलेक्ट्रिक व ऑटोनॉमस वाहन क्षेत्रात सखोल संशोधनाकरिता आयआयटी दिल्लीज सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह रिसर्च व ट्रायबोलॉजी (CART) सोबत करार केला. फाउंडेशन फॉर इनोव्हेशन अँड टेक्नोलॉजी ट्रान्सफरच्या माध्यमातून करण्यात आलेल्या भागीदारीद्वारे आयआयटी दिल्लीचे एमजीच्या सीएएसई मोबिलिटी (कनेक्टेड-ऑटोनोमस- शेअर्ड-इलेक्ट्रिक) च्या प्रयत्नांना अधिक बळकटी देण्याचे उद्दिष्ट आहे. याकरिता भारतातील नागरी क्षेत्रात इलेक्ट्रिक व ऑटोनॉमस वाहनांच्या वापरावरील संशोधनासाठी पाठबळ दिले जाईल.

 

या संशोधनात या भागातील कनेक्टेड मोबिलिटीचाही समावेश असेल. तसेच रूट प्लॅनिंग व नेव्हिगेशन, अडथळे शोधणे, अखंड व नैसर्गिक मानवी हस्तक्षेप तसेच संकेत व निर्णय घेण्याकरिता एआय आदींचा यात समावेश असेल. एमजीने पहिली इंटरनेट एसयूव्ही एमजी झेडएस ईव्ही आणि पहिली ऑटोनॉमस लेव्हल १ प्रीमियम एसयूव्ही ग्लॉस्टर लाँच केली. भविष्यातील स्वयंचलित वाहने विकसित करण्याच्या दृष्टीने संशोधनाचा वापर करण्याचा उद्देश यामागे आहे.

 

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष श्री राजीव छाबा म्हणाले, “एमजीमध्ये ऑटोमोटिव्ह क्षेत्रात सतत अभूतपूर्व नूतनाविष्कार करण्यावर आमचा भर असतो. आयआयटी-दिल्लीसोबत भागीदारी करणे आमच्यासाठी सन्मानकारक आहे. जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात ही दिग्गज संस्था आहे. शहरातील परिस्थितींमध्ये ऑटोनॉमस टेक्नोलॉजीवर संशोधन करणे हे आयआयटी दिल्लीतील विद्यार्थ्यांसाठीही महत्त्वाचे ठरेल, अशी आम्हाला खात्री आहे.”


यापूर्वीही एमजीने आयआयटी दिल्लीसोबत जिओफेंसिंगद्वारे इन-कार चाइल्ड सेफ्टी सीट प्रोजेक्टला प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभराच्या प्रकल्पावर काम केले आहे. वाहन व दळणवळण सेवा अधिक सुरक्षित आणि हरित होण्याकरिता विद्यार्थी आणि स्टार्टअप्समध्ये ग्रँड इनोव्हेशन चॅलेंज हॅकेथॉन्सचे आयोजन आयआयटी दिल्लीच्या सहकार्याने केले होते.

Post a Comment

0 Comments