महाविकास आघाडीच्या पॅनलचा दारुण पराभव दोन्ही मंत्र्यांची प्रतिष्ठा धुळीत मिळाली..
ठाणे, प्रतिनिधी  :  ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत सहकार पॅनलचे बाजी मारली असून २१ पैकी १८ जागा जिंकल्या असून मतदारांनी महाविकास आघाडीचा दारुण पराभव केलयाबद्दल ब. वी. आ. चे नेते, लोकनेते श्री. हितेंद्र ठाकूर व भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार किसन कथोरे यांनी मतदारांचे यावेळी आभार मानले. 


परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यानी ही निवडणूक प्रतिष्ठेची करून सुद्धा बँकेच्या मतदारांनी त्यांना नाकारले असे आ. केळकर यांनी सांगून सहकार पॅनलचे गेल्या टर्म मधील कार्याला मिळालेली ही पोचपावती असून सहकार पॅनल मध्ये अनुभवी संचालक असून पुढील काळात बँक अधिक नावारुपाला नेण्याचे काम हे संचालक करतील असा विश्वास आ. केळकर यांनी बोलताना व्यक्त केला. 

Post a Comment

0 Comments