भाजपच्या,वतीने महिला दिनी आरोग्य, कायदेविषयक माहिती,सामाजिक जाणिवा विषयी व्याख्यान

डोंबिवली ( शंकर जाधव ) येथील प्रभाग क्र. ८१ गांधीनगर आणि भाजप महिला मोर्चा यांच्यावतीने गांधीनगर येथील स्वामी नारायण सत्संग सभागृहात महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी महिलांचे आरोग्य, कायदेविषयक माहिती आणि इतर जाणिवांमध्ये वाढ व्हावी याकरिता व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.या  व्याख्यानमालेचे आयोजन भाजप डोंबिवली पूर्व मंडळ उपाध्यक्ष पंढरीनाथ म्हात्रे आणि पूनम म्हात्रे यांनी केले होते. यावेळी अॅड.संगीता मेनन,डॉ.शीतल झोपे. डॉ. मीनाक्षी संघवी,राधिका केतकर आणि चित्रा माने यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पप्रिया राणे व रुपाली साळवी यांनी केले. यावेळी वाॅर्ड सचिन माने, युवा सरचिटणीस मंदार जोशी, सुभम मटाले,गौरव तावडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता अथक मेहनत घेतली. महिलाच्या उन्नतीसाठी ज्या काही तरतुदी कायद्यात केल्या आहेत त्याविषयी माहिती देण्यात आली पोशो कायदा, कुटुंबिक वाद, विवाहविषयक कायदे याबाबत महिलांना माहिती अॅड.संगीता मेनन यांनी व्याख्यानात दिली.


तर भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या चित्रा माने यांनी सांगितले कि, महिलांनी सर्वागीण प्रगती केली तरच महिलांचे सबलीकरण होऊ शकते. स्वतःचे आरोग्य, स्वतःचे ज्ञान आणि समाजात वावरताना जाणिव निर्माण होणे महत्त्वाचे आहे.पुढे डॉ. शीतल झोपे यांनी आरोग्यविषयक माहिती देताना सांगितले कि, आम्ही होमियोपॅथी मध्ये शारीरिक आजाराबरोबर मानसिक आजारावर उपचार करतो.महिलांनी शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आजाराकडे लक्ष दिले पाहिजे.महिलांमध्ये वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आजार प्रामुख्याने दिसून येतात.वयाच्या २० ते ४० आणि ४० शी नंतर विविध आजारांना सुरुवात होते.अश्या वेळी महिलांना एका चांगल्या श्रोत्याची गरज असते. होमिओपॅथी डॉक्टर, त्यांचे श्रोते असल्याची गरज पूर्ण करते.

Post a Comment

0 Comments