अनधिकृत बांध कामावर पालिकेची कारवाई सुरूच

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  महापालिका आयुक्तडॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार व विभागीय उप आयुक्त उमाकांत गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली अ प्रभाग क्षेत्रातील वासूंद्री रोड येथील रामेश्वर पाटील यांच्या २ टप-या तसेच रेल्वे फाटकटिटवाळा ते अभिलाषा पार्क रस्त्यामध्ये बाधित ३ गोडाऊन आणि टिटवाळा येथील ॲसिड कंपनी जवळ रिंगरोडमध्ये बाधित रुम निष्कासनाची धडक कारवाई आज करण्यात आली. 


सदर कारवाई अ प्रभागक्षेत्र अधिकारी सुधिर मोकल यांचे अतिक्रमण विरोधी पथक तसेच महापालिकेचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने व १ जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली. ई प्रभागातही प्रभागक्षेत्र अधिकारी अक्षय गुडधे यांच्या पथकाने भोपर रोडवरील डि मार्ट समोरील दिपक पाटील यांचे ३  अनधिकृत गाळे निष्कासित करण्याची कारवाई जेसीबीच्या सहाय्याने केली.


Post a Comment

0 Comments