ठाण्यात जागतिक पुनर्चक्रि करण दिना निमित्त प्लास्टीक कचऱ्या बाबत जन जागृती पर कार्यक्रमाचे आयोजन

 ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण विभाग, परिसर भगिनी विकास संस्था, स्त्री मुक्ती संघटना आणि बिस्लेरी इंटरनॅशनल लि. “बॉटल फॉर चेंज” यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक पुनर्चक्रिकरण दिनानिमित्त माजिवडा येथील ठामपा प्लास्टीक संकलन केंद्रामध्ये प्लास्टीक  कचऱ्याबाबत जनजागृतीपर कार्यक्रम आयोजन करण्यात आले.यावेळी प्लास्टिक कचऱ्या गोळ्या करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कचरावेचक महिलांचा तसेच 10वी / 12वी परीक्षेत यश प्राप्त झालेल्या त्यांच्या मुलांचा विशेष सत्कार करण्यात आला.


     या कार्यक्रमास टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे पदाधिकारी, महानगरपालिका क्षेत्रातील विविध गृहसंस्थाचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


    या कार्यक्रमात बिस्लेरी इंटरनॅशनल लि. “बॉटल फॉर चेंज” यांनी ठाणे महानगरपालिकेस प्लास्टीक कचऱ्यापासून बनविलेले दोन बेंच दिले.  सदर संस्थेने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील एक वर्षामध्ये 230 टन प्लास्टीक कचऱ्याचे संकलन करुन पुनर्चक्रीकरण केले आहे. यासाठी टीसीएस व ठाणे शहरातील विविध गृहसंकुले नियमितपणे वर्गीकृत प्लास्टीकचा कचरा उपलब्ध करुन देत आहेत. दरम्यान महानगरपालिकेच्या वतीने टीसीएस व गृहसंकुलाच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. 

    

     प्लास्टिक पुनर्चक्रिकरण उपक्रम यशस्वीपणे राबविण्याकरिता कार्यरत असणाऱ्या कचरावेचक महिलांचा व 10वी / 12वी परीक्षेत यश प्राप्त झालेल्या त्यांच्या मुलांचा सत्कार देखील करण्यात आला.  हा पर्यावरणपूरक  संपूर्ण उपक्रम यशस्वीपणे कार्यान्वित राखल्याबद्दल बिस्लेरी इंटरनॅशनल लि. “बॉटल फॉर चेंज” यांचा ठाणे महानगरपालिकेच्यावतीने प्रमाणपत्र देवून विशेष सत्कार करण्यात आला.


Post a Comment

0 Comments