भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महिला कोरोना योद्ध्यांचा सन्मान
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा महिला मोर्चा आणि श्री राम सेवा मंडळ यांच्यावतीने महिला दिनाचे औचित्य साधून महिला कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. भाजपा नगरसेविका तथा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा रेखा राजन चौधरी यांच्यावतीने रुक्मिणीबाई रुग्णालय, शास्त्रीनगर रुग्णालय आणि टिळकनगर पोलीस स्टेशन याठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला.

   

   कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता या महिला कोरोना योद्ध्यांनी नागरिकांची सेवा केली. याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञ ता व्यक्त करण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महिला कोरोन योद्ध्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.


       पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालय, शास्त्री नगर रुग्णालय आणि टिळकनगर पोलीस स्टेशन येथील डॉक्टर, परिचारिका आणि महिला पोलिसांना यावेळी गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे १९९० साली अयोद्ध्या येथे कारसेवा करणाऱ्या शुभांगी केसरीनाथ उल्लेंगल यांचा देखील सन्मान करण्यात आला. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी यांच्यासह जिल्हा सरचिटणीस पुष्पा रत्नपारखी या उपस्थित होत्या.


      दरवर्षी महिला दिनानिमित्त मोठ्या स्वरूपात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा कोरोनामुळे छोट्या स्वरूपात हा कार्यक्रम करून महिला कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला असल्याची माहिती रेखा चौधरी यांनी दिली.

Post a Comment

0 Comments