महिलांच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांवर मार्गदर्शन


 डोंबिवली ( शंकर जाधव ) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मधुमालती एंटरप्रायझेस तर्फे खास महिलांसाठी `नाते शरीराशी मनाचे.. संतुलन `ती`च्या आरोग्याचे` हा विशेष मुलाखतीचा कार्यक्रम संपन्न झाला. महिलांमध्ये आढळून येणाऱ्या शारीरिक आणि मानसिक समस्या आणि त्यांचा परस्परांशी असलेला संबंध याविषयी मार्गदर्शनपर असलेल्या या मुलाखतीत डॉ. गायत्री मुळ्ये (एम. डी. आयुर्वेद) आणि मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक सिद्धी वैद्य या तज्ज्ञांचा सहभाग होता. 
महिलांमध्ये साधारणतः दिसून येणाऱ्या शारीरिक आणि मानसिक समस्याया समस्या कशा ओळखाव्यात्याची काळजी कशी घ्यावी यासंदर्भात दोन्ही तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.महिलांनी घर आणि काम सांभाळताना रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या तब्येतीची काळजी कशी घ्यावीआहार कसा असावाएखादा त्रास सुरू झाल्यास डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा यासंबंधी डॉ.गायत्री मुळ्ये यांनी माहिती दिली. तसेच मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी मोकळेपणाने संवाद साधणेस्वतःसाठी वेळ देणेभूतकाळ आणि भविष्याचा विचार न करता वर्तमानात असणाऱ्या गोष्टींचा आनंद घेणे महत्वाचे असल्याचे समुपदेशक सिद्धी वैद्य यांनी सांगितले. स्त्रीने तिचे स्वास्थ्य जपण्यासाठी स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये असा सल्ला दोन्ही तज्ज्ञांनी दिला.
 आणि शरीर आणि मनाचा परस्परांशी असलेला संबंध समजावून सांगितला. प्राजक्ता वैशंपायन हिने तज्ज्ञांची मुलाखत घेतली. कार्यक्रमाचे ब्रँन्डींग पार्टनर ट्रायनेट कम्युनिकेशन होते. मुलाखतीचा हा कार्यक्रम मधुमालती एन्टरप्रायझेसच्या फेसबुक पेजवर आणि Muditaa - Step towards a delightful mind  या युट्यूब चॅनेल वर पहाण्यासाठी उपलब्ध आहे असे मधुमालती एन्टरप्रायझेसच्या संदीप वैद्य यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments