रस्त्याचे क्रॉक्रीटी करणाचे काम लवकरच सुरू होऊन नागरिकांना चांगला रस्ता मिळेल - रविंद्र चव्हाण
डोंबिवली  शंकर जाधव ) डोंबिवली पूर्वेकडील शिवमार्केट प्रभागात हा रहदारीचा, शाळकरी विद्यार्थी ये-जा भाजी मार्केटकडे जाणारा रस्ता आहे. त्यादृष्टीकोनातून डोंबिवलीकर चांगला रस्ता मिळावा म्हणून भाजपचे माजी नगरसेवक विश्वदीप पवार यांनी प्रशासनाने पाठपुरावा केला होता.पवार यांच्या प्रयत्नाला यश आले असून महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार रविंद्र चव्हाण यांच्या आमदार निधीतून फतेह अली पथ या रस्त्याच्या क्रॉक्रीटीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.


        यावेळी आमदार चव्हाण बोलत होते.आपल्या प्रभागात खड्डयाची समस्या जाणवत होती.प्रभागातील दोन रस्त्याचे काम सुरू केले आहे.टिळकनगर आणि फतेह अली रोडच्या क्रॉकीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहेअशी माहिती भाजपचे माजी नगरसेवक विश्वदीप पवार यांनी दिली.यावेळी माजी नगरसेवक मंदार हळबे,विश्वदीप पवार भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. चव्हाण म्हणाले,शिवमार्केट हा संपूर्ण भागातील अत्यंत रहदारीचा रस्ता आहे.            या रस्त्यावर नित्याने शाळकरी विद्यार्थी ये-जा करीत असतात नागरीक सुध्दा भाजी मार्केटकडे जात असतात.या रस्त्याचे क्रॉक्रीटीकरणाचे काम लवकरच सुरू होऊन नागरिकांना चांगला रस्ता मिळेल. या रस्त्यासाठी आमदार निधीतून  ५० लाखांचा निधी दिला आहे. चांगल्या दर्जाचा रस्ता व्हावा यासाठी ठेकेदारांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम चांगलेच होईल.तसेच टिळकनगर भागात रस्ता क्रॉक्रीटीकरण करण्यासाठी निधी दिला आहेअसे चव्हाण यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments