Header AD

डोंबिवली मध्ये बंद घरातील लाकडी वस्तुंना आग....

डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली पूर्वेच्या फडके रोडवर  बंद असलेल्या गोडाऊनला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.ही घटना मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास  घडली.  आग लागण्याचेे कारण समजू शकले नाही. बंद गोडाऊन मधील लाकडी वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या. 


डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवर प्रियदर्शनी नावाची तळ अधिक 1 मजल्याची इमारत आहे. या इमारतीमधील पहिल्या मजल्यावर बंद असलेल्या घरात नको असलेल्या लाकडी वस्तूंचे सामान ठेवण्यात आले होते. या सामानाला अचानक आग लागली. लाकडी सामानामूळे क्षणार्धातच या आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.  आग लागलेल्या इमारती शेजारी असलेल्या इमारतीमध्ये बँक, लॉंड्री आणि ज्वेलर्सची दुकाने होती. आग लागल्याचे दिसताच  व्यापाऱ्यांनी ही दुकाने बंद करत सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.  अग्निशमन दलाचे तीन बंब  घटनास्थळी तातडीने धाव घेत अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले.  तरी या इमारतीच्या मागे असणाऱ्या झाडाच्या फांद्या जाळल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
डोंबिवली मध्ये बंद घरातील लाकडी वस्तुंना आग....  डोंबिवली मध्ये बंद घरातील लाकडी वस्तुंना आग.... Reviewed by News1 Marathi on March 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads