बा. ना. बांदोडकर महाविद्यालयात धुम्रपान निषेध दिवस ऑनलाईन वेबिनार संपन्न
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : विद्या प्रसारक मंडळाच्या  बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्र छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने "धुम्रपान निषेध दिवस"  साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सलाम मुंबई फाउंडेशनचे प्रतिनिधी आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचे पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


मिलिंद पाटील यांनी मार्गदर्शनाची  सुरूवात व्यसनमुक्तीची शपथ देऊन करण्यात आली. तसेच व्यसनांमुळे माणसास शारीरिकमानसिक व सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते.  दारूगुटखातंबाखूसेगरटअमली पदार्थांचे सेवन व त्यांचे दुष्परिणाम या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. तंबाखू च्या सेवनाच्या चक्र व्यूहातून तरूण पिढीला बाहेर काढूननिकोटीन व तंबाखूच्या व्यसनापासून प्रतिबंध करणे. ही या वर्षीची जागतिक आरोग्य संघटनेची मुख्य संकल्पना आहे.


देशात प्रत्येक १६ सेकंदाला एक मूल तंबाखूचे पहिल्यांदा सेवन करतो तर दर दिवशी हा आकडा ५ हजार ५००  मुलांपर्यंत जातो. या व्यसनाच्या दृष्टचक्रापासून अलिप्त ठेवण्यासाठी प्रत्येक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूविरोधी मानसिकता निर्माण करणे आवश्यक आहे.  तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनांचा समाजावर मोठा परिणाम होत आहे. अनेकांना कर्करोगासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांनी व्यसन केल्यास त्याचा परिणाम आरोग्यासह शिक्षणावरही होत असल्याचे मिलिंद पाटील यांनी सांगितले.


यावेळी कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी पोस्टरव्हीडिओचित्रफीतीव्दारे धुम्रपानाबद्दल जनजागृती करून व्यसनमुक्तीचे अवाहन केले. याप्रसंगी बांदोडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोझेस कोलेटउपप्राचार्य डॉ. डी. आर. आंबावडेकरराष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयक डॉ. उज्वला गोखेकार्यक्रम अधिकारी प्रा. आकांक्षा शिंदे, डॉ. प्रल्हाद वाघयुवा जागरचे समन्वयक प्रा. अनिल आठवलेआय.टी. विभाग प्रमुख अभिजित काळेप्रा. सुधीर भोसले व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. 

Post a Comment

0 Comments