जागतिक महिला दिना निमित्त कोविड योद्ध्या महिलांचा सन्मान
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कल्याण पूर्व शिवसेना महिला आघाडीतर्फे रेखा शरद पाटील यांच्या वतीने पालिकेच्या गीता हरकिसनदास दवाखान्यातील आरोग्य सेविकांचा कोविड योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.


       कोरोना महामारीच्या सुरवातीपासून आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका, लॅब टेक्निशियन, आया आदी महिला आरोग्य सेविका नागरिकांच्या आरोग्यासाठी काम करत आहे. हे काम करतांना या महिलांना आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना सेवा दिली आहे. अशा या कोविड योद्ध्यांना त्यांच्या या कामाबद्दल गौरविण्यासाठी शिवसेनेच्या वतीने रेखा पाटील यांनी प्रमाणपत्र, गुलाबपुष्प आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.


       यावेळी शिवसेना शाखा संघटक नूतन म्हात्रे, तेजस्वी पाटील, सोनाली सावंत, वनिता यादव, अश्विनी भोसले, शकुंतला डिंगे, शरू साबळे, ज्योत्सना जगताप, जिजा आंगडे, संतोषी पांडे, अर्चना महाले, कमल शिंदे, निलांबरी धिडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या. दरम्यान या उपक्रमाला डॉ. सुलक्षणा त्रिभुवन, परिचारिका वंदना गुंजाळ यांनी सहकार्य केले.    

Post a Comment

0 Comments