भिवंडीतील कामवारी नदीत जलपर्णीची चादर, नदीचे पात्र होतेय कमी ...

भिवंडी दि १५ (प्रतिनिधी  ) शहरालगत असलेल्या कामवारी नदीच्या पत्रात विकासकांनी अतिक्रमण करून टोळेजंग इमारती बांधन्यात आल्या असून त्यामुळे कामवारी नदीचे पात्र कमी होत असताना आता संपूर्ण नदीत   जलपर्णीची चादर पसरल्याने कामवारी नदी धोक्यात निर्माण झाला आहे, 
 भिवंडी महापालिका प्रशासन नगरसेवक ,व महसूल अधिकारी यांच्या जाणीवपूर्वक  दुर्लक्षामुळे कामवारी नदी पात्रात  अतिक्रमण वाढले आहे त्यातच नदीचे पात्र कमी झाल्याने नदी किनारी अतिक्रमण करणाऱ्या विकासकांनी नदीच्या पत्रात जलपर्णी वनस्पती सोडून नदीचे पात्र हडप करण्याचे षडयंत्र सुरु असल्याचा आरोप नदीचे अभ्यासक करीत आहे. मात्र जलपर्णी वनस्पती मुळे पाण्याची पातळी कमी होऊन नदी निर्जीव होत आसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक आणि त्यांचा रोजगार धोक्यात आला आहे त्यामुळे कामवारी नदीतील जलपर्णी ही धोकादायक  वनस्पती काढणे गरजेचे आहे अशी मागणी परिसरातील चाळीस गावातील शेतकरीनी एमएमआरडीए व सीआरझेडचे अधिकारी यांच्या कडे केली आहे मागणी केली आहे जर त्वरित कारवाई न झाल्यास या दोन्ही कार्यालया समोर आंदोलन केले जाईल असा ही इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे

Post a Comment

0 Comments