टीसीच्या सतर्क तेमुळे वाचले प्रवाशाचे प्राण कल्याण रेल्वे स्टेशन वरील घटना सी,सी,टीव्हीत कैद
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर सकाळी साडेनऊ वाजता चालती पुष्पक एक्सप्रेस ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाचा तोल गेल्याने तो खाली पडत होता. 


यावेळी प्लॅटफॉर्मवर उभे असलेल्या टीसी शशांक दिक्षित यांची नजर त्या प्रवाशावर पडली.  टीसी शशांक दीक्षित यांनी समय सूचकता दाखवत याठिकाणी धाव घेत त्या प्रवाशाला ट्रेनच्या आत लोटले. त्यात या प्रवासाचा जीव वाचला ही संपूर्ण घटना स्टेशनवर असलेल्या सिसीटीव्हीत कैद झाली आहे.


Post a Comment

0 Comments