कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी युवक कॉंग्रेसचे आरोग्य शिबीर
कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली जिल्हा युवक काँग्रेस पार्टीतर्फे फ्री मेडिकल चेकअप शिबिराचे आयोजन रविवारी कल्याण पश्चिमेतील इंदिरानगर येथे करण्यात आले होते.


 कॉंग्रेसचे जेष्ठ नेते संजय दत्त व युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, ब्रिजकिशोर दत्त व युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनीष देसले यांच्या सहकार्याने सहकार्याने फिरोज शेख यांनी या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने परिसरातील नागरिकांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यापासून बचावासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे याचे मार्गदर्शन देखील नागरिकांना करण्यात आले.

Post a Comment

0 Comments