कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण डोंबिवलीत निर्बंध लागू
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असून आज एकाच दिवशी तब्बल ३९२ रुग्ण आढळल्याने पालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून पालिका आयुक्तांनी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सह पोलीस आयुक्त अनिल पोवार  आणि प्रशासनासोबत बैठक घेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत.


कोरोनाच्या महामारीला तोंड देण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावेअसे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज केले. महापालिका क्षेत्रात मोठया प्रमाणात रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे सोशल डिस्टंसिंगमास्कची कारवाई अधिक तीव्र करणेबाबत सुचना दिल्या असून उदयापासून काही निर्बंध लागू करणार असल्याची माहिती त्यांनी उपस्थित पत्रकारांना दिली.


अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने सकाळी ७ ते सायं. ७ या कालावधित सुरु राहतील. तर शनिवाररविवार पी १पी २ प्रमाणे दुकाने उघडी राहतीलअसेही त्यांनी यावेळी सांगितले. वडापावच्या गाडयाचायनिजच्या गाडया येथे लोक नियमांचे उल्‍लंघन करतात. त्यांना यापुढे सायं. ७ वाजेपर्यंतच परवानगी देण्यात येणार आहे. भाजी मंडई देखील ५० टक्के क्षमतेने चालू राहतील. लग्नहळदी समारंभ यावर कडक निर्बंध घालण्यात येत असून शासनाच्या नियमांचे उल्‍लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतीलअशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.


      बाररेस्टॉरंट आता रात्री ११ वाजेपर्यंतच उघडी राहतीलआठवडी बाजार पूर्णपणे बंद राहतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे होम आयसोलेशन मधील रुग्ण बाहेर फिरतांना आढळल्यास त्याचेवरही कारवाई करण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.

Post a Comment

0 Comments