कोरोना काळात नागरिकांवर पाणी कपातीचे संकट भाजप नगरसेविकेचा आत्म दहनाचा इशारा
डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोना संसर्गामुळे नागरीक अडचणीत आले आहेत.तर दुसरीकडे उन्हाळ्याच्या तीव्र झळा सोसाचव्या लागत असल्याने शहरात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत असल्याचे सध्या बघायला मिळत आहे. एमआयडीसी आणि पालिका प्रशासन यांच्यात पाणी बिल थकबाकीवरून अनेक वर्षापासून वाद सुरु आहे.या वादात नागरिकांना पाणी कपातीने घराबाहेर सकाळी ४ वाजता नळावर पाणी भरण्यासाठी रांग लावतात.तर टॅकरने पाणी मागवावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसतो.अनेक वर्षापासून हीच परिस्थिती असल्याने नागरिक लोकप्रतिनिधींना जाब विचारतात.अशीच परिस्थिती डोंबिवलीजवळील सांगाव- सांगर्ली प्रभागातील नागरिक पाणी टंचाईने हैराण झाले आहे.येथील भाजपच्या माजी नगरसेविका डॉ.सुनीता पाटील यांनी वारंवार डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी विभागात पत्र व्यवहार केला. मात्र याला  एमआयडीसीने काहीही सकारात्मक भूमिका घेतली नाही.अखेर माजी नगरसेविका डॉ. पाटील यांनी  

    

एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांना पाणी कपात रद्द न केल्यास आत्मदहन करू असा इशारा दिला आहे.

   

 


निव्वळ पाणी पुरवठ्यापोटी थकबाकी १०१ कोटी रुपये, मंजूर कोट्यापपेक्षा जास्त पाणी वापरावरील दंडात्मक रक्कम ४ कोटी,जलमापक बंदपोटी दंडात्मक रक्कम ५० टक्के व १०० टक्के ८१ कोटी आणि विलंब शुल्क २३५ असे ४२२ कोटी २७ गावाची पाणी बिल थकबाकी आहे. पालिका प्रशासनाने २०१६ साली २७ गावाचे फक्त  कोटी रुपये पाणी बिले एमआयडीसीकडे भरले होते.
उर्वरित ४१८ कोटी रुपये थकबाकी अद्याप पालिकेने एमआयडीसीकडे भरली नाही.थकबाकी व नियमित देयकांचा भरणा होत नसल्याने एमआयडीसीने २७ गावातील पाणी कपात करावे लागत असल्याचे एमआयडीसीने पालिकेला पत्रद्वारे कळविले आहे.वास्तविक २७ गावे पालिकेत समाविष्ट झाल्यानंतर त्या गावातील पाणी, रस्ते आणि इतर सुविधा नागरिकांना व्यवस्थित मिळवून देणे हि पालिका प्रशासनाची जबाबदारी आहे.पालिका प्रशासन यातून मार्ग काढण्याएवजी पाणी बिल थकवत आली आहे. गेली पाच वर्ष पालिका प्रशासन हेच करत आल्याने गावातील जनतेला पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. नागरिक मात्र लोकप्रतिनिधींना याचा जाब विचारत असून लोकप्रतिनिधी एमआयडीसी तर कधी पालिका प्रशासनाकडे हेलपाटे मारतात.मात्र थकबाकी भरत नाही तोपर्यत पाणी कपात करत राहणार अशी एमआयडीसीची भूमिका आहे.पालिका प्रशासन आणि एमआयडीसीच्या या थकबाकीवादात २७ गावातील नागरिकांना कोरोना काळात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
डोंबिवली पूर्वेकडील सांगाव-सांगर्ली प्रभागाच्या भाजपच्या माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांनी अखेर कंटाळून एमआयडीसी डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांना पत्र देऊन लवकरात लवकर पाणी पुरवठा कपात न करता सुरळीत करा अन्यथा आत्मदहन करीन असा इशारा दिला आहे.दरम्यान लोकप्रतिनिधीला अश्या प्रकारे जनतेसाठी पाऊले उचलावी लागत असेल तर पालिका प्रशासन आणि एमआयडीसीला जागे करावे लागेल अशी चर्चा सुरू झाली आहे.

 

Post a Comment

0 Comments