कोविड उपचार केंद्रात दाखल महिलांच्या विनयभंगाचे प्रकार निषेधार्ह केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई दि. 5 - कोविड उपचार केंद्रात दाखल महिलांचा  विनयभंग होण्याच्या राज्यात घडलेल्या घटना महाराष्ट्राच्या प्रतिमेवर कलंक लावणाऱ्या निषेधार्ह आहेत.याबाबत महाविकास आघाडी सरकारचे  दुर्लक्ष झाल्यानेच राज्यात असे निंदनीय प्रकार घडत आहेत.हे प्रकार रोखले पाहिजेत;  महिलांच्या सुरक्षेकडे राज्य  सरकार लक्ष घालून कायदा आणि सुव्यवस्था मजबूत राखावी असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. 

 

मुंबईत मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृह येथे  विविध विषयांवर आयोजित बैठकीनंतर पत्रकार परिषदेस ना.रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; काकासाहेब खंबाळकर; गौतम सोनवणे;दयाळ बहादूरे: ऍड.अशा लांडगे; प्रकाश जाधव; जगदीश गायकवाड; जयंती गडा ; लखमेन्द्र खुराणा; सिद्धार्थ कासारे बाळासाहेब गरुड; सोना कांबळे; सुमित वजाळे आदी मान्यवर उपस्थित होते.मनपा च्या सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे द्यावीत


मुंबईतील मनपा च्या 25 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या सफाई कामगारांना डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेतून मालकी हक्काचे घर द्यावे त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणा च्या मुंबई मनपा ला मिळणारी घरे मनपा च्या सफाई कामगारांना द्यावीत. तसेच मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडील घरे सुद्धा राज्य शासनाने मुंबई मनपाच्या  सफाई कामगारांना घरे द्यावीत. 


कोरोना योद्धे म्हणून सफाई कामगारांना केंद्र सरकारने  दर्जा दिला आहे.सफाई कामगारांना धुळे मनपा ने मालकी हक्काची घरे दिली आहेत.मुंबई मनपा चे बजेट मोठे आहे त्यातील 5 टक्के निधी सफाई कामगारांच्या घरा साठी तरतूद करावी. मुंबई मनपा च्या सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे मिळावीत त्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त आणि महापौर यांना आजच्या बैठीकीचा अहवाल देणारे  पत्र पाठविणार असल्याची माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली.


सफाई कामगारांच्या हजेरी चौकी बांधाव्यात तिथे महिला सफाई कामगारांसाठी चेंजिंग रूम; स्वच्छता गृह आणि जल जोडणी द्यावी याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येऊन तसे निर्देश केंद्रीय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिले.


महाड येथील चवदार तळे मधील पाणी पिण्या योग्य राहिले नाही.त्या पाण्याचे शुद्धीकरण करावे. त्यासाठी 1 कोटी 37 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.मात्र  जीवन प्राधिकरण आणि महाड नगर परिषद यांच्या वादातून महाड चवदार तळे आणि तेथील शाहू महाराज सभागृह यांची दुरुस्ती अद्याप प्रलंबित असल्याची माहिती या बैठकीत उघडकीस आली.


त्यावर महाड नगर परिषदेने टेंडर काढले असून लवकरच जल शुद्धीकरण यंत्र महाड चवदार तळे येथे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. कल्याण मधील एन आर सी कंपनीतील कामगारांना न्याय देणार. कामगारांची देनी अदाणी ग्रुप ने द्यावीत.या बाबत न्यायालयाचा निर्णय अदानी कंपनी मान्य करेल असा विश्वास अदानी ग्रुप च्या अधिकाऱ्यांनी दिले असल्याचे ना रामदास आठवले यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments