कल्याण शीळ काँक्रीट रस्त्याचे काम संथ गतीने मनसे आमदार राजू पाटील यांनी केली रस्त्याच्या कामाची पाहणी
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण-शीळ काँक्रीट रस्त्याच्या कामाची  पाहणी आज मनसे आमदार राजू पाटील यांनी केली. यावेळी काँक्रीट रस्त्याचे काम संथ गतीने चालू असल्याचे दिसून आले. तसेच काही ठिकाणी कलवट सुद्धा तयार न केल्याचे दिसून आले. याबाबत आणि इतर कामाबाबत यावेळी अधिकाऱ्यांना मनसे आमदार यांनी काही सूचना केल्या. तसेच ट्रॅफिक कसे कमी करता येईल याबाबतच्या सूचना देखील मनसे आमदार पाटील यांनी दिल्या.


शिळफाटा ते कोन या रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरु असून कामाच्या पुर्णत्वाबाबत अनेक तारखा देण्यात आल्या मात्र अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. काही ठिकाणी कामाचे सातत्य दिसत नसून गुणवत्तेमध्येही कमतरता दिसत आहे. यासाठी या रस्त्याच्या कामाची पाहणी केली असल्याची प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली. दरम्यान यावेळी एमएसआरडीसीचे अधिकारीठाणे आणि केडीएमसीचे अधिकारीट्रॅफिक पोलीसमनसे जिल्हासंघटक हर्षद पाटीलशहरअध्यक्ष मनोज घरत आदीजण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments