भिवंडी वकील संघटनेच्या अध्यक्षपदी अँड.मनजीत राऊत, उपाध्यक्ष पदी अँड.रवि सोनवणे

भिवंडी दि १५ (प्रतिनिधी  ) ठाणे जिल्ह्यात प्रतिष्ठीत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी वकील संघटनेची निवडणूक नुकतीच संपन्न झाली असून या संघटनेच्या अध्यक्षपदी मनजीत राऊत यांची तर  उपाध्यक्ष पदी अँड.रवि  सोनवणे यांची  निवड झाली  आहे.त्यामुळे मान्यवर वकिलांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


          भिवंडी वकील संघटनेची सन २०२१ त २०२३ या दोन वर्षासाठी ही कार्यकारणीची निवड करण्यात आली.ज्येष्ठ वकील नारायण अय्यर व दिनेश्वर पाटील यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. सुमारे तीनशे हुन अधिक वकीलांनी मतदान या निवडणुकीत केले.


          यावेळीअध्यक्षपदी अँड.मनजीत वसंत राऊत, उपाध्यक्ष - अँड.रवि काशिनाथ सोनवणे,सचिव-अँड.जितेंद्र रविकांत पाटील,खजिनदार - अँड. समीर पाटील,सह सचिव - अँड. अभिषेक डी .भोई,आणि कमेटी सदस्य म्हणून अँड.अनिल वखारे,अँड अलसभा मेहमूद मोमीन,अँड कल्पेश साईनाथ ठाकूर,अँड सचिन मोतीराम पाटील,अँड अंकित कडू,अँड निवेदिता वतारी यांची निवड करण्यात आली..

Post a Comment

0 Comments