पावसाळ्या पूर्वी रस्तांची कामे पूर्ण करा आयुक्त डॉ.पंकज आशिया
भिवंडी , प्रतिनिधी  :  शहरात विविध ठिकाणी रस्ते व भूमिगत गताराची कामे चालू आहेत ही सर्व कामे मे अखेर पर्यंत म्हणजेच पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत असे आदेश पालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांनी सर्व संबधित प्रधिकरणला दिले, शहरातील रस्ते सिमेंट काँक्रेटी करणं कामाचा  आयुक्त यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते त्यावेळी आयुक्त बोलत होते. याबैठकीला अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, भिवंडी पूर्व विभाग सहायक आयुक्त प्रशांत ढोले, वाहतूक पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने, एम.एम.आर.डी चे कार्यकारी अभियंता राजेंद्र देवरे,  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे नागवेकर, पालिका उपायुक्त दीपक झिंजाड, पालिका शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, नगररचनाकार श्रीकांत देव, ईगल कंपनीचे ठेकेदार इंजी.वाहिद, इंजी.विकी, शहर विकास अधिकारी साकीब खर्बे, इत्यादी उपस्थित होते. 


या बैठीकत शहरात सुरू असलेल्या 52 मंजूर रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण पैकी 15 रस्ते, भूमिगत गटार योजना अंतर्गत   याचा आढावा नुकताच घेण्यात आला. यामध्ये आग्रा रोड हरिधारा  शॉपिंग सेंटर के ब्रह्मानंद नगर, नारपोली आशीर्वाद  हॉटेल ते नारपोली जकात नाका कामण रोड, भिवंडी बस स्टँड ते फातिमानगर -गायत्री  नगर गायत्री नगर बाबा हॉटेलपर्यंत, अजंटा कंपाऊंड चव्हाण प्रेस रोशन बाग धामणकर नाका, अशोक नगर ते कल्याण रोड पर्यंत, रतन टॉकीज ते भंडारी कंपाउंड सोनुबाई कंपाउंड,  भारत मेडिकल ते ज्ञानेश्वर मेडिकल आग्रा रोड, शिवाजी चौक ते संगम पाडा, तीन बत्ती हफिजी  बाबा दर्गा,  ब्राह्मण आणि टिळक चौक नवभारत शाळा कासार आळी, नारपोली बाळू पाटील चौक ते दिवानाशा दर्गा , धामणकर नाका उड्डाणपूल चे भाजी मार्केट वरालदेवी चौक, दर्गा रोड ते कारीवली गावपर्यंत आणि जामा मशीद ते सईदी हॉटेल  पर्यंत या रस्त्यांच्या कामाचा आढावा आयुक्त डॉ.पंकज आशिया यांनी घेतला.


 या वेळी प्रत्यक्ष काम किती झाले आहे काम किती बाकी आहे, या रस्त्याच्या विकास कामात येणारे सर्व अडथळे, अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करून देणे, विद्युत जनित्र ट्रान्सफॉर्मर हटविणे, विद्युत वाहिनी तारा, भूमिगत गटार, मलनिस्सारण व  पाण्याच्या सेवा वाहिका, व्यवस्था, रस्त्यामध्ये येणारी बाधित होणारी झाडे,या बाबत  बैठकीत चर्चा झाली.आयुक्त डॉ.पंकज आशिया यांनी सर्व संबधित आदेश दिले की  रस्ते विकासाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी, तसेच विकास कामे पूर्ण करताना त्याच्या गुणात्मक दर्जा योग्य राखणे आवश्यक आहे. विकास कामे करताना नागरिकांना जास्त त्रास होणार नाही,  याची दक्षता देखील प्रत्येक विभागाने घ्यावी अशी सूचना आयुक्त यांनी केली.

Post a Comment

0 Comments