आर. सी पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश
ठाणे (प्रतिनिधी)  :-  ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजातील ज्येष्ठ नेते तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आर. सी. पाटील आणि त्यांचे पुत्र भाजपचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अरूण पाटील यांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी गृहनिर्माण मंत्री डाॅ जितेंद्र आव्हाड आणि ठाणे शहराध्यक्ष मा. खा. आनंद परांजपे हे उपस्थित होते.  


आर.सी. पाटील यांचा ठाणे जिल्ह्यातील एक महत्वाचे नेतृत्व म्हणून नावलौकिक आहे. आगरी समाजात त्यांना प्रचंड महत्व आहे.  मूळचे काँग्रेसी असलेले  आर. सी. पाटील हे मध्यंतरी भाजपमध्ये गेले होते. भाजपने त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. आज त्यांनी मुंबई येथे अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीची ग्रामीण भागातील ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Post a Comment

0 Comments