एस टी महामंडळ कंत्राटी कामगारांना रेशन किट वाटप




कल्याण , कुणाल  म्हात्रे   : आरएसपी अधिकारी युनिटचे कमांडर मनिलाल शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वामीनारायण ट्रस्टचे विश्वस्त दिनेश ठक्कर, रोटी डे ग्रुपचे केतन शहा, कच्छ युवक संघाचे तरुण नागडा, कौशिक भाई यांच्या  सौजन्याने कल्याण एस टी महामंडळ आगारातील कंत्राटी कामगारांना मोफत रेशन किट वाटप करण्यात आले. त्यामध्ये तांदूळ, तूरडाळ, गोडेतेल, मीठ, पीठ  आदी साहित्याचा समावेश होता.


आगार व्यवस्थापक विजय गायकवाडआर बी अपोत्कर, वाहतूक नियंत्रक डी.सी. चतुर्भुज, प्रकाश शिनकर आदींच्याहस्ते ३५ कंत्राटी कामगार, सफाई कामगार व बुट पॉलिश कामगार यांना मोफत रेशन किट वाटप करण्यात आले. या उपक्रमाबद्दल आगार व्यवस्थापक विजय गायकवाड यांनी आर एस पी अधिकारी युनिटचे व दानशूर दात्यांचे आभार व्यक्त केले. दिनेश ठक्करस्वामीनारायण ट्रस्ट, तरुण नागडा, राठोड, कौशिक आणि संस्थेचे सगळे सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले.


यावेळी आरएसपी अधिकारी युनिटचे रामदास भोकणल, केशव मालुंजकरजितेंद्र सोनवणे, बोरसेप्रभाशंकर शुक्ला उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आणि उपस्थित मान्यवरांचे आणि दात्यांचे वाहतूक नियंत्रक प्रकाश शिणकर यांनी आभार मानले. 

Post a Comment

0 Comments