व्यापारी महामंडळ आणि ज्वेलर्स असोसिएशनने घेतली प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांची भेट


दुकाने पी-१ पी-२ नको...पालिका आयुक्तांना फेरविचार करण्याची मागणी


डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यत सुरु ठेवण्याचे आणि शनिवार आणि रविवारी  पी-१ पी-२ प्रमाणे सुरु ठेवावी असे आदेश दिले आहे. परंतु डोंबिवली व्यापारी महामंडळ आणि ज्वेलर्स असोसिएशनने पी-१ पी-२ विरोध करत शनिवारी पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात शिष्टमंडळाने प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले.पालिका आयुक्तांनी यासंदर्भात फेरविचार करावा अशी मागणी केली.तर सोमवारी पालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी हे याबाबत निर्णय घेतली असे प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

  

 दुकानदारांनी कोरोनाच्या निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यासाठी पालिका प्रशासनाचे लक्ष आहे.सायंकाळी ७ नंतर दुकाने सुरु दिसल्यास प्रशासन दुकाने बंद करण्यास सांगतात.दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यत सुरु ठेवण्याचे आणि शनिवार आणि रविवारी  पी-१ पी-२ प्रमाणे सुरु ठेवावी असे आदेश दिले आहे.परंतु हॉटेल्स आणि बार यांना रात्री ११ पर्यत सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहे.तर शनिवार आणि रविवारी पी-१ पी-२ प्रमाणे सुरु ठेवावे असेही सांगण्यात आले.


प्रशासन दुकानदारांना एक नियम आणि हॉटेल्स आणि बार यांना वेगळा नियम का ? पी-१ पी-२ ठेवणे योग्य नाही असे म्हणत डोंबिवली व्यापारी महामंडळ आणि ज्वेलर्स असोसिएशनने पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत,संदीप रोकडे यांची भेट घेतली.डोंबिवली व्यापारी महामंडळ कार्यकारी प्रमुख दिनेश भोर, डोंबिवली ज्वेलर्स असोसिएशनचे सेक्रेटरी दिलीप राठोर यांनी आपले म्हणणे मांडताना म्हणाले, दुकाने सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यत तर शनिवार आणि रविवारी पी-१ पी-२ प्रमाणे सुरु ठेवण्याचा आदेश मागे घेऊन आठवड्यातून एकदा बंद ठेवू.


`ग`प्रभाग क्षेत्र हद्दीत सायंकाळी ७ नंतर दुकाने सुरु आहेत मग आमच्या दुकानांन वेगळा न्याय का ? असा प्रश्न उपस्थित केला.याबाबत`फ`प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत सांगितले कि, `फ`प्रभाग क्षेत्र हद्दीत सायंकाळी ७ नंतर दुकाने सुरु नसतात.मात्र `ग`प्रभाग क्षेत्र हद्दीत दुकाने सायंकाळी ७ नंतर सुरु असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला असेल तर `ग`प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्याबाबत व्यापाऱ्यांना उत्तर द्यावे.तर रामनगर पोलीस ठाण्याचे वपोनि सचिन सांडभोर यांनी व्यापारी आणि प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या चर्चेअंती व्यापाऱ्यांना आवाहन केले कि, लॉकडाऊन टाळायचा असेल तर शासनाने लागू केलेल्या कोरोनाचे नियम पालन करा.

Post a Comment

0 Comments