कल्याण डोंबिवलीत २४१ रुग्ण तर एक मृत्यू




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज २४१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १५२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक जणाचा मृत्यू झाला आहे.


 

आजच्या या २४१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६३,६९० झाली आहे. यामध्ये १७८० रुग्ण उपचार घेत असून ६०,७३६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११७४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २४१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२८,  कल्याण प – ७८डोंबिवली पूर्व ८१डोंबिवली प – ३३मांडा टिटवाळा  १५तर मोहने   येथील ६ रुग्णांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments