Header AD

परीक्षा शुल्क विषयात नारायणा स्कुलच्या विरोधात माजी आमदार नरेंद्र पवार आक्रमक


विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या आड येऊ नका अन्यथा आक्रमक पाऊल उचलण्याचा इशारा....


कल्याण  , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पश्चिम येथील नारायणा स्कुलमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या अनेक तक्रारी आल्यानंतर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आता आक्रमक पाऊल उचलले आहे. सदर शाळेच्या संस्थापक व मुख्याध्यापक यांना एक खरमरीत पत्र पाठवत थेट सवाल केले आहेततसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या आड येऊ नका असेही माजी आमदार तथा भाजपा प्रदेश सचिव नरेंद्र पवार यांनी सदर पत्रात नमूद केले आहे.


नारायणा स्कुलमध्ये अनेक पालकांनी आपल्या मुलांचा प्रवेश घेतला आहे मात्र सातत्याने त्यांना अडचणी येत असल्याने त्यांनी मुख्याध्यापक व संबंधित अधिकाऱ्यांनाही माहिती दिली मात्र कोणतीही कार्यवाही न झाल्याने आता नरेंद्र पवार यांनी यावर आवाज उठवला आहे.


राज्य सरकारकडून ना हरकत दाखला घेतला आहे काठाणे शिक्षणाधिकाऱ्याकडून प्रथम मान्यता प्रमाणपत्र घेतले आहे काराईट टू एज्युकेशन अंतर्गत पुनर्मान्यता प्रमाणपत्र घेतले आहे काकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची परवानगी घेतली आहे काअसे अनेक प्रश्न सदर पत्रातून विचारले आहेत. आपल्या शाळेत शिक्षकांची यादी व पात्रताही जाहीर लिहिलेली नाहीतुम्हाला जर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची परवानगी नसेल तर कोणत्या आधारावर इयत्ता नववीचा वर्ग सुरू करणार असल्याचा प्रश्नही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी विचारला आहे.


इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची परवानगी नारायणा स्कुलच्या कल्याण शाखेला मिळाली नसतानाही प्रवेश दिले आहेतआणि सदर परीक्षेला विद्यार्थ्यांना अंधेरी आणि भांडुप या ठिकाणी ४५ किलोमीटर दूर पाठवणार असल्याचे सांगण्यात येत आहेकोरोनाच्या काळात इतका प्रवास करूच शकत नाहीत, JEE च्या तयारीसाठी जी शिकवणी घेतली आहे त्याच्या शुल्कासाठी पालकांकडे दबाव टाकला जात आहेशुल्क नाही भरले तर परीक्षा देता येणार नसल्याचेही शाळेकडून सांगण्यात येत आहे मात्र कोरोनाच्या काळात दबाव टाकणे योग्य नाहीविद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचित ठेऊ शकत नसल्याचेही नरेंद्र पवार म्हणाले.


सातत्याने दरवर्षी शाळेचे शुल्क वाढवले जात आहेप्रवेश घेत असताना सांगितलेल्या योजनाही विद्यार्थ्यांना मिळत नाहीतशाळेकडे पूर्णवेळ शिक्षक नाहीतऑनलाइन शिक्षणासाठी कोणीतीही सूट दिली नाहीपहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घोर फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी आहेतत्यावर शाळा प्रशासन कोणीही ठोस उत्तर देत नाहीयावर तातडीने मार्ग काढला नाही तर आक्रमक भूमिका घेणार असल्याचेही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले.


परीक्षा शुल्क विषयात नारायणा स्कुलच्या विरोधात माजी आमदार नरेंद्र पवार आक्रमक परीक्षा शुल्क विषयात नारायणा स्कुलच्या विरोधात माजी आमदार नरेंद्र पवार आक्रमक Reviewed by News1 Marathi on March 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads