कल्याण डोंबिवलीत कोरोनाच उद्रेक ३९२ नवीन रुग्णांची नोंद
कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा उद्रेक झाला असून आज एकाच दिवशी तब्बल ३९२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १६९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एकही मृत्यू झाला नाही.


      आजच्या या ३९२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६५,४३३ झाली आहे. यामध्ये २३६० रुग्ण उपचार घेत असून ६१,८९६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३९२ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-६७,  कल्याण प – १२८डोंबिवली पूर्व १२९डोंबिवली प – ५२मांडा टिटवाळा – १२, तर मोहना येथील ४ रुग्णांचा समावेश आहे.


Post a Comment

0 Comments