‘तिचं’ अस्तित्व शाँर्ट फिल्मच सभापती ललिता पाटील यांच्या हस्ते अनावरण
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : स्त्रीला स्वतःचं अस्तित्व स्वतःच दाखवायला पाहिजे. एकविसाव्या शतकात वावरणा-या स्त्रीने इतर कोणावरही अवलंबून न राहता स्वतःचं अस्तित्व स्वतःच सिद्ध कराव. जागतिक महिला दिन साजरा करताना स्वतः महिलांनी आपण सबळ झालेलो आहोत हे दाखवून रोजच साजरा. असे वक्तव्य भिवंडी पंचायत समितीच्या सभापती ललिता प्रताप पाटील यांनी तिचं अस्तित्व या लघुचित्रपटाच्या अनावरण प्रसंगी काढले.


तिचं अस्तित्व या शाँर्ट फिल्मच्या उद्घाटन भिवंडी पंचायत समितीच्या सभापती ललिता प्रताप पाटीलगटविकास अधिकारी डॉ. प्रदिप घोरपडेगटनेते पंचायत समिती सदस्य गुरुनाथ जाधव, भानूदास पाटीलयशवंत भोईरगटशिक्षणाधिकारी नीलम पाटीलशिक्षण विस्तार अधिकारी संजय अस्वलेसंजय थोरातकेंद्रप्रमुख जयश्री सोरटेप्रिया पाटील,  संघटनेचे नेते महेंद्र पाटीलधीरज भोईरनंदू नाईकज्योती धुमाळ तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.


तिचं अस्तित्व या लघुपटाचे लेखन- दिग्दर्शन अजय लिंबाजी पाटील शाळा राहनाळ, छायाचित्रण साईश गोठिवरेकरएडिटिंग वल्लभ केणे यांनी केले आहे. या लघुपटात कलाकार म्हणून हर्षा बडगुजरशारदा चौधरीअजिता पाटीलअजय पाटीलबालकलाकार अदित्य सोनारनिशा चव्हाण आणि अंजली निकम यांनी अभिनयाची छाप सोडली आहे.


महिला सतत स्वतःचे अस्तित्व नाकारत असतातत्या नेहमी इतरांवर अवलंबून असतातनिर्णय क्षमतेत पुरुषांना पुढे करून स्वतः मात्र मागे राहतातएकविसाव्या शतकात हे अत्यंत चुकीचं आहे. महिलांनी सबल झाले पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी स्वतः सिद्ध करावे. या लघुपटात महिला स्वतःचं अस्तित्व नाकारत असताना एक लहान मुलगी मात्र स्वतःचं अस्तित्व सिद्ध करत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रवींद्र तरे यांनी केले. एक सकारात्मक संदेश देणारा हा लघुपट लक्ष्मी चित्र या यूट्यूब चँनलवर प्रकाशित करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments