कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ६९ हजारांचा टप्पा ५९५ नवीन रुग्ण तर १ मृत्यू


कल्याण , कुणाल म्हात्रे   :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ६९ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज ५९५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत २०८  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.      आजच्या या ५९५ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६९,३०१ झाली आहे. यामध्ये ४३१२ रुग्ण उपचार घेत असून ६,७९७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११९२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ५९५ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-९२कल्याण प – १८१डोंबिवली पूर्व १९०डोंबिवली प – ८९मांडा टिटवाळा – ३७तर मोहना येथील ६ रुग्णांचा समावेश आहे.


Post a Comment

0 Comments