खडवली नदीत दोन तरुण बुडाले पोलीस आणि अग्निशमन दलाची शोध मोहीम सुरु
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   खडवली येथील भातसा नदीत आपल्या मित्रांसोबत आंघोळ करण्यासाठी आलेले दोन तरुण नदीत बुडून बेपत्ता झाल्याची घटना गुरुवारी घडली असून पोलीस आणि अग्निशमन दलाने पाण्यात शोध मोहीम चालू केली असून मात्र अद्यापही त्यांचा शोध लागला नाही.


भिवंडी येथे राहणारे नफिस शेख इम्तियाजमुन्नाभाईमोहम्मद अमिर हे चार मित्र  खडवली नदीत आंघोळ करण्या करीता आले होते. सायंकाळी पाच वाजता मोहम्मद शफिक व नफीस अहमद शेख हे दोघे  खडवली नदी मध्ये आंघोळी करता उतरले असताना त्यांचे इतर मित्र हे नदीचे किनाऱ्यावर जेवण करत बसले होते. साधारण दहा मिनिटा नंतर नदीच्या पाण्यात उतरलेले मोहम्मद शफिक व नफीस अहमद शेख हे पाण्यात कुठे दिसून आले नाहीत त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत.


याबाबत टिटवाळा येथील पोलीस स्थानकात याबाबत माहिती देण्यात आली. पोलीस आणि अग्निशमन दल तसेच गावातील पोहणाऱ्या तरुणांच्या टीमने पाण्यात खूप वेळ शोध घेतला पण हे दोन तरुण सापडले नाहीत यानंत अंधार पडल्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली. मात्र आज सकाळी पुन्हा शोध मोहीम चालू केली असून अद्यापही हे तरुण हाती लागलेले नाहीत.

Post a Comment

0 Comments