भिवंडीत पान टपरीवर गुटखा विक्री करणाऱ्यावर अन्न निरीक्षकांची कारवाई

 


भिवंडी :दि.१० (प्रतिनिधी ) गुटखा विक्री करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उचलल्या नंतर अन्न व औषध प्रशासन  विभागाने  आपला मोर्चा पान टपरी व्यवसायिकां कडे वळविला असून त्यासाठी सहाय्यक आयुक्त भूषण मोरे यांच्या नेतृत्वाखाली अन्न निरीक्षक शंकर राठोड ,माणिक जाधव, खडके व सानप यांनी मागील दोन दिवसात कोनगाव पोलीस ठाणे क्षेत्रात कोनगाव ,पिंपळास ,गोवे नाका ,राजनोली या परीसरात धडक कारवाई करीत पान टपरी वर गुटखा ,तंबाखूजन्य अन्नपदार्थ तसेच जनतेच्या आरोग्यास अपायकारक ठरणाऱ्या स्वादिस्ट,सुंगधीत तंबाखू आणि
अपायकारक उत्पदित गुटखा, पानमसाला, खरा, मावा, व तत्सम पदार्थ सुपारी  इत्यादीची निर्मीती, साठवणुक, वितरण वाहतुक किंवा विक्री करण्यासाठी साठवणूक करून ठेवल्याचे आढळून आल्याने त्या विरोधात कारवाई सुरू केली आहे . 


         मागील दोन दिवसात तब्बल आठ पान टपऱ्या सील करून पान टपरी चालकांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत सर्वाना ताब्यात घेतले आहे .दरम्यान दोन दिवसां पासून भिवंडी शहरात सुध्दा अशी कारवाई करीत ९ व कोनगाव पोलीस स्टेशन अंतर्गत  ८ पान टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून या सर्वां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या कारवाई नंतर अनेक पानपट्टी चालक दुकान बंद करून बसले असून गुटखा विक्री करणाऱ्या पानपट्टी चालकांमध्ये खळबळ माजली आहे .भिवंडी शहरात यापुढे ही कारवाया सतत सुरू राहतील अशी माहिती  सहाय्यक आयुक्त भूषण मोरे यांनी दिली आहे .

Post a Comment

0 Comments