टाळेबंदी नको असेल तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धार्मिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, आयुक्त डॉ.पंकज आशिया
भिवंडी , प्रतिनिधी  :   विविध धर्मीय यांचे धार्मिक सण व उत्सव साजरे होणार आहेत, याच वेळी कोरोनाची दुसरी साथ येण्याची शक्यता आहे. आपले धार्मिक सण उत्सव आनंदाने साजरे करा पण हे सर्व करताना   नागरिकांनी  आपल्या आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहून कोरोनास दूर ठेवावे जर  पुन्हा टाळेबंदी नको असेल तर, याकामी   राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे  सर्व धार्मिक संस्था यांनी लसीकरण करणेकामी व कोरोना जनजागृती बाबत पुढाकार घेऊन पालिकेस  सहकार्य करावे,असे आवाहन पालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांनी केले.              पालिका  क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असल्याने याबाबत जनजागृतीचा एक भाग म्हणून सर्व प्रमुख धार्मिक संस्था विश्वस्त पदाधिकारी, यांची बैठक  पालिका  आयुक्त डॉ.पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी आयुक्त डॉ.आशिया बोलत होते. आयुक्त पुढे म्हणाले की, गेल्यावेळी कोरोना बाबत   स्थानिक धार्मिक, सामाजिक संस्था यांनी फार चांगल्या प्रकारे काम केलं त्यामुळेच आजही भिवंडी सुरक्षित आहे,  शहरातील धार्मिक, सामाजिक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात विविध  माध्यमद्वारे नागरिकांना कोरोना बाबत जनजागृती  करावी, जास्तीत जास्त लोकांनी लस घेण्याकरता पुढे यावे. ही लस चांगल्या प्रकारे सुरक्षित असून त्याचे कोणत्याही प्रकारे दुष्परिणाम होत नाहीत.  कोरोनाबाबत महापालिका आपल्यापरीने  सर्व खबरदारी घेत आहे, याकामी महानगरपालिकेचे रुग्णवाहिका  सेवा सतर्क राहील , कोवीड रुग्णांना हॉस्पिटलमध्ये तातडीने रुग्ण यांना बेड, जागा मिळणे याकडे देखील लक्ष देण्यात येणार आहे.              मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील आपल्या भागात धार्मिक, सामाजिक  संस्था यांनी  मोहल्ला क्लीनिक सुरू करावीत, या कामी  स्थानिक धार्मिक, सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, याकामी पालिका योग्य ते सहकार्य करेल. जेणे करून,  कोरोनाचे येणार संकट दूर राहील, कोरोनावर मात करावयाची असेल  प्रत्येक नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावयाची आहे.  या बाबतीत राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना  दिलेल्या आहेत, त्याचे  तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे हे सर्व करण्याकरिता धार्मिक संस्था यांची मदत आवश्यक आहे, लस घेण्याबरोबरच मास्क  वापरणे, सामायिक अंतर ठेवणे , वारंवार हात धुणे, sanitizer वापर करणे आणि गर्दीची ठिकाणी टाळणे, जसे की बाजार पेठ, भाजी मार्केट, लग्न कार्य, धार्मिक प्रार्थना, सांस्कृतिक कार्यक्रम, अंत्ययात्रा या वेळी  गर्दी होणार नाही, तसेच त्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होण्याची लक्षणे जास्त आहेत. तरी याबाबत देखील काळजी घेण्यात यावी. 
 यावेळी इंदिरा गांधी रुग्णालय हे कोवीड हॉस्पिटल राहणार नाही* तर   खुदाबक्ष कोवीड सेंटर, वराला कोवीड  केंद्र, इत्यादी ठिकाणी कोवीड  उपचार सुरू करण्यात येणार आहेत.*महापालिकेकडे स्वतःची कोवीड तपासणी लॅब आहे* त्यामुळे दररोज तीनशे ते चारशे तपासण्या होऊ शकतात. त्यामुळे काळजी करण्यासारखे कारण नाही, असा विश्वास आयुक्त डॉक्टर  डॉ.पंकज आशिया यांनी व्यक्त केला. 


             तसेच या वेळेला रुग्णाला घरातल्या घरातच विलगीकरण  करण्यात येणार आहे. कोणालाही जबरदस्तीने संस्थात्मक अलागिकरण कक्षात ठेवले जाणार नाही, काही  खाजगी हॉस्पिटलमध्ये देखील उपचार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच खाजगी रुग्णालयात लसीकरण सुरू करणे बाबत आयुक्त यांनी सांगितले की, याबाबतचे सर्व निर्णय हे  केंद्रीय आरोग्य विभाग घेत असल्याने लसीकरण केंद्र वाढविण्याबाबत हा निर्णय देखील केंद्रीय आरोग्य विभाग घेणार आहे. राज्य शासन, किँवा पालिकेला लसीकरण केंद्र वाढविण्याचा अधिकार नाही. जर  धार्मिक व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन लसीच्या बावतीत सकारात्मक प्रचार करून लसीकरण कसे वाढेल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे रोजच्या रोज लसीकरण ईश्टांक  पूर्ण झाला तर नक्कीच लसीकरण केंद्र वाढविण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येईल. याकरता लसीकरण याकडे जास्त लक्ष द्यावे असे आवाहन पालिका आयुक्त यांनी सर्व धार्मिक संस्था यांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना केले आहे.             परत मागील वर्षा प्रमाणे टाळेबंदी नको असेल तर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना याचे पालन करून पालिकेस सहकार्य करावे. जास्तीत जास्त नागरिकांनी लस घेऊन, कोरोना पासून आपला  बचाव करावा असे आवाहन देखील पालिका आयुक्त डॉक्टर पंकज आशिया यांनी केले.याबैठीस अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी कारभारी खरात, जागतिक आरोग्य संघटनेचे भिवंडी समन्वयक डॉ.किशोर चव्हाण, वैद्यकीय आरोग्य अधिकारी वर्षा बारोड, डॉ.मनीषा पाटील फडके, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, तसेच मौलाना मुफ्ती मोहमद हुसेन काझी, विठ्ठल मंदिर विश्वस्त दिनेश शेटे, मौलाना फैयाज काझी, मौलाना साजिद काझी, प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या सेविका, गणपती मंदिर ब्राह्मण आळीचे मनोज कुंटे,भिमेश्वर मंदिराचे शेखर कोपरकर, रामेश्वर मंदिराचे भूषण रोकडे, प्रभू इस्कॉनचे सचित दास , भारतीय बौद्ध महासंघ यांचे सोमित्र कांबळे, बालाजी कांबळे, तेलगू समाज प्रतिनिधी राजू गाजेंगी , ख्रिस्ती समाज प्रतिनिधी अजित थोरात, राधास्वामी सत्संग परिवार चे प्रतिनिधी गोपालसिंह ठाकूर, इत्यादी  धार्मिक संस्था प्रमुख पदाधिकारी यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments