खासदार कपिल पाटील यांनी घेतली करोना प्रतीबंधक लस

डोंबिवली    ( शंकर जाधव ) वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर लसीकरणासाठी पात्र ठरलेल्या खासदार कपिल पाटील यांनी  करोना प्रतीबंधक लस  घेतली. देशभरात दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला वेगाने सुरुवात झाली आहे. खासदार कपिल पाटील यांनी शुक्रवारी वयाची साठ वर्ष पूर्ण केली. साठ वर्षांवरील नेते व कार्यकर्त्यांनी खाजगी रुग्णालयात सशुल्क लस घ्यावी, असा भाजपाने आदेश दिला आहे. 


सामान्य नागरिकांना मोफत लसीकरणाचा फायदा व्हावा, हा दृष्टिकोन त्यामागे आहे. त्यानुसार खाजगी रुग्णालयात जाऊन खासदार कपिल पाटील यांनी  करोना प्रतिबंधक लस  घेतली. लस पुर्णतः सुरक्षित असून भिवंडी लोकसभा मतदारसंघासह महाराष्ट्रातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील  रुग्णांनी लसीकरणाचा फायदा घ्यावा. आपल्या जवळच्या केंद्रात ॲप वरून नोंदणी किंवा टोकन घेऊन गर्दी टाळून लसीकरण करून घ्यावे. तसेच कोरोना निर्मूलनात आपला खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन खासदार कपिल पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments