स्वीमिंग असोसीएशन ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी दीपक मेजारी यांची निवड
डोंबिवली ( शंकर जाधव )  स्वीमंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र ऑलिम्पीक असोसीएशन मान्यताप्राप्त नामांकित संस्था असलेल्या स्विमिंग असोसीएशन ऑफ महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी दीपक मेजारी यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. मेजारी यांच्या निवडीने संस्थेच्या इतिहासात प्रथमच मुंबई आणि उपनगराला अध्यक्षपदाचा बहुमान देण्यात आला आहे. शनिवारी हि प्रतिष्ठेची निवडणूक पार पडली. यावेळी पुण्यातील नीता तालवीलकर यांची सचिवपदी तर मुंबईतील किशोर शेट्टी यांची खजिनदार म्हणून निवड झाली असून हि निवड दोन वर्षासाठी असणार आहे. मेजारी यांच्या निवडीनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

     

       शनिवारी मेजारी यांनी व्यास यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारताच त्यांनी महाराष्ट्रात स्विमिंग अकेडमी स्थापन करणार असल्याची घोषणा केली. देशात केवळ बंगलोर आणि दिल्लीत असलेली हि अकेडमी महाराष्ट्रात लवकरच सुरु करणार असून याद्वारे स्विमिंग प्रशिक्षक आणि लाईफ गार्ड प्रशिक्षण दिले जाईल ज्याद्वारे तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतील.          तसेच स्पर्धात्मक स्विमिंगला प्रोत्साहन मिळवून देण्यासाठी दुर्लक्षित असलेल्या स्विमिंग डायव्हिंगस्विमिंग पोलो यासारख्या खेळाचे प्रशिक्षण देखील या एकेडमीच्या माध्यमातून दिले जाणार असल्याचे मेजारी यांनी सांगितले.जलतरण क्रीडा प्रकारात विशेष रुची असलेल्या मेजारी यांना जास्तीत जास्त खेळाडूनी या खेळाकडे वळावे यासाठी सतत प्रयत्न केले आहेत.


            डोंबिवली जिमखान्यातील तरणतलावात अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांच्यावर स्विमिंग असोसीएशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.संस्थेचे मागील अध्यक्ष अभय दाढे यांच्या मृत्युनंतर रिक्त झालेल्या या पदाचा कारभार वर्षभर मयूर व्यास चालवत होते.

Post a Comment

0 Comments