जागतिक वन दिना निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी तसेच ग्रामीण कृषि अर्थ व्यवस्थेच्या बळकटी साठी तरुणांनी एकत्र यावे या विचाराने जागतिक वन दिनाचे औचित्य साधत ठाणे वन परिक्षेत्रमुरबाड वन परिक्षेत्र (पश्चिम) आणि अश्वमेध प्रतिष्ठानमुरबाड यांच्या संयुक्त विद्यमाने अश्वमेध भवनमासले बेलपाडा येथे विविध उपक्रमांचे  आयोजन करण्यात आले होते.


      पर्यावरण संवर्धनात आपले योगदान देत असताना तरुणांनी आपदग्रस्त परिस्थीत स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण कसे करावे या साठी पर्यावरण प्रेमीसर्पमित्र दत्ता बोंबे (अग्निशमन विभागअंबरनाथ) व पर्यावरण प्रेमी हेमंत जाधव यांनी कल्याणभिवंडी बदलापूरमुरबाडठाणे आदी परिसरातून आलेल्या प्रशिक्षणार्थींना रेस्क्यू मॅनेजमेंटचे यथायोग्य प्रशिक्षण दिले. तसेच प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी पर्यावरणाचा समतोल राखण्यात आणि त्यातून कृषिपुरक व्यवसाय संधी असणाऱ्या मधुमक्षिका पालन आणि संवर्धन या विषयावर प्रा. डुंबरे ( निवृत्त प्राध्यापकअग्रीकल्चर तथा  मधुमक्षिका अभ्यासक) यांनी उपस्थित तरुणपरिसरातील शेतकरी व पर्यावरण प्रेमी यांना पावर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारा मार्गदर्शन केले. या प्रसंगी हिरवे (सब डिएफओ ठाणे वनपरिक्षेत्र), रमेश रसाळ (आरएफओ वनपरिक्षेत्र मुरबाड)जंगम (कार्यकारी अभियंतातथा प्रशासक मासले बेलपाडा) विविध परिसरातून आलेले अभ्यासकशेतकरी ग्रामस्थप्रशिक्षणार्थी तरुण उपस्थित होते.


 मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तरुणांची प्रश्नोत्तरे आणि विचार संवादातून कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्वमेध प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश हरड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वन विभाग ठाणेवनविभाग मुरबाडअश्वमेध प्रतिष्ठानच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments