अ, प्रभाग क्षेत्रातील अनाधिकृत बांधकामावर मनपाची तोडक कारवाई

 कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  अ प्रभाग क्षेत्रातील अटाळी परिसरातील अनाधिकृत तळमजला अधिक ३ माळे असलेल्या इमारतीवर अ प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने धडक कारवाईचा बडगा उचलित हातोडा चालवित तोडक कारवाई  केली. तसेच २ अनाधिकृत पानपट्टीच्या हातगाड्यावर हातोडा चालवित भुईसपाट करण्यात आल्या.


या कारवाईसाठी १ जे.सी.बी. १ब्रेकर,  क.डो.म.पा अनधिकृत बांधकाम पथकाचे १४ कर्मचारी७पोलिस कर्मचारी,  असा फौज फाटा होता. आयुक्त  डॉ. विजय सूर्यवंशीअनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उप आयुक्त उमाकांत गायकवाड यांच्या निर्देशानुसार कारवाईचा बडगा सुरु राहणार असुन अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यावर एमआरटीपी अँक्टनुसार गुन्हे दाखल करीत कारवाई सुरू असणार असल्याचे प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांनी सांगितले.

 

Post a Comment

0 Comments