भिवंडी शिळ रस्ता पावसाळ्या आधी पूर्ण करण्याचा प्रयत्न

 

एमएसआरडीसी  सहव्यवस्थापकीय संचालक  विजय वाघमारे..


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : भिवंडी ते शिळ या २१ किलोमीटर ४ पदरी  रस्त्याचे ६ पदरीकरणाचे काम एमएसआरडीसीच्या  माध्यमातून  सुरु असून या संदर्भातील अडीअडचणी निस्तरण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत बैठक पार पडली.  या बैठकीला एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील, आरटीओ अधिकारी उपस्थित होते.


   या रस्त्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु असून यामध्ये २ पदरी रस्त्याचे बऱ्यापैकी काँक्रीटीकरण झाले असल्याने वाहतूक कोंडी देखील बहुतांशी सुरळीत झाली आहे.  उर्वरित रस्त्याचे काम पावसाळ्या आधी कसे पूर्ण करता येईल या अनुषंगाने हि बैठक  घेण्यात आली. काही ठिकाणी भूसंपादनाच्या समस्या असून त्या देखील सोडविण्याच्या सूचना करण्यात आल्या.  रस्त्याचे काम करतांना वाहतूक कोंडीच्या काही समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी वाहतूक विभागाला  देखील सूचना करण्यात आल्या आहेत. असल्याची माहिती  एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी दिली.       


Post a Comment

0 Comments