धुळवडीला खडवली नदीवर शुकशुकाट
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : हिंदू संस्कृतीतला महत्वाचा समजला जाणारा मोठा सण म्हणजे होळी. देशभर तो उत्साहात साजरा केला जातो. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रभाव कमी कमी होता होता पुन्हा नव्याने जास्तीच वाढल्याने या दुसऱ्या लाटेत ठाणे जिल्ह्यासह कल्याण तालुक्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने प्रशासनाकडून कडक निर्बंध लादले गेले आहेत. त्यामुळे दरवर्षी खडवली रेल्वे स्थानका नजीक असलेल्या भातसा नदीवर शुकशुकाट पाह्यला मिळाला.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून होळी सणांवर काही निर्बंध लादले गेल्याने परिसरात बहुतांशी ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळाला. खडवली येथील निसर्गरम्य वातावरण आणि नदीचे वाहते स्वच्छ सुंदर पाणी मुबंई उपनगरातील पर्यटकांना भुरळ घालत असते. धुळवड खेळून झाल्यानंतर भातसा नदीवर धुळवडीचा रंग काढण्यासाठी अनेक जण येत असतात. मात्र यावर्षी कोरोनाचा वाढता कहर पाहता या ठिकाणी दरवर्षी  होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी कडक बंदोबस्त या ठिकाणी ठेवला होता.  अशा परिस्थितीत काहीजण नदीकडे फिरकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र या ठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांकडून त्यांना सुचान देऊन परतवून लावण्यात येत होते.

Post a Comment

0 Comments