भिवंडीत डाइंगचे केमिकल मिश्रित पाणी रस्त्यावर नागरिक हैराण

भिवंडी दि ४ (प्रतिनिधी ) भिवंडीत केमिकल डाईंग व सायजिंग मोठ्या प्रमाणात फोफावल्या आहेत . अनेक वेळा या डाईंग सायजिंग मालकांकडून शासकीय नियमांची पायमल्ली होतांना दिसते मात्र शासकीय अधिकारी व स्थानिक नेते पुढाऱ्यांच्या वरदहस्तामुळे या डाईंग सायजिंगवर कोणतीही कारवाई होत नसल्याने शहरासह ग्रामीण भागात असलेल्या डाईंग सायजिंगचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे . 


         भिवंडीतील ग्रामीण भागात अंजूरफाटा वसई महामार्गावर असलेल्या कालवार येथील गणराज कंपाउंड या गोदाम संकुलनात असलेल्या वल्लभ आर्ट या डाईंग मालकाकडून शासकीय नियमांची पायमल्ली सुरु असून डाईंग मधून निघणारा केमिकल मिश्रित पाणी थेट रस्त्यावर सोडण्यात येत असल्याने रस्त्यावर हिरव्या रंगाचा केमिकल मिश्रित पाणी साचत आहे . या पाण्याला दुर्गंधी येत असल्याने येथील नागररिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 


          येथील स्थानिक नागरिकांनी याविषयी डाईंग मालकाला अनेक वेळा समज देण्याचा प्रयत्न केला असून देखील डाईंग मालकाकडून केमिकल मिश्रित पाणी रस्त्यावर सोडण्याचा प्रकार सुरूच आहे त्यामुळे आम्हाला नाहक त्रास होत आहे अशी प्रतिक्रिया येथील स्थानिक नागरिक सुनील म्हात्रे यांनी दिली आहे. यासंदर्भात चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया भिवंडीचे तहसीलदार अधिक पाटील यांनी दिली आहे . 

Post a Comment

0 Comments