पाथर्ली येथील पालिकेच्या शाळेत लसीकरण केंद्र पुन्हा सुरु करण्याची मागणी..


 


डोंबिवली ( शंकर जाधव ) सामाजिक अंतर, तोंडावर मास्क आणि वाढता प्रतिसाद असे असूनही शासनाच्या निर्देशानुसार फक्त रुग्णालयातच कोरोना प्रतीबंधक लस टोचली जाणार असल्याने डोंबिवली पूर्वेकडील पाथर्ली येथील पालिकेच्या आचार्य भिसे गुरुजी प्राथमिक विद्यालयात लसीकरण केंद्र बंद करण्यात आले.गेल्या सहा दिवसांपासून सदर केंद्रावर  सुमारे १७०० ज्येष्ठ नागरिकांनी लस टोचून घेतली.या केंद्रात लस टोचल्यानंतर पाहणी कक्षात पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली ज्येष्ठ नागरिकांना अर्धा तास बसविले जाते.जर कोणाला त्रास झालाच तर त्यांना जवळील डोंबिवली जिमखाना येथील केंद्रात नेण्याची सोय करण्यात आली होती. 


एवढे असूनही पालिका प्रशासनाने शासनाच्या निर्देशानुसार सदर ठिकाणचे लसीकरण केंद्र बंद केले यासंदर्भात भाजपचे माजी नगरसेवक निलेश म्हात्रे म्हणाले, याठिकाणी शासनाच्या सर्व नियमांचे पालन केले जात होते. लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसादहि मिळत होता.मात्र आता हे लसीकरण केंद्र पालिकेने बंद केले आहे.या ठिकाणी पुन्हा केंद्र सुरु करावे अशी ज्येष्ठ नागरिकांनी मागणी केली आहे. तरी प्रशासनाने याचा विचार करून या ठिकाणी लसीकरण केंद्र पुन्हा सुरु करावे.  

Post a Comment

0 Comments