राष्ट्र वंजारी सेवा समिती महिला शाखेचा स्तुत्य उपक्रम महिला दिनी महिला कोरोना योध्यांचा सन्मान
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती, महिला शाखा यांच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन मर्यादित संख्येत वंजारी भवन कल्याण येथे ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता खंभिरपणे वैद्यकीय सेवा देणा-या महिला तसेच पोलीस क्षेत्रातील महिला व अंगणवाडी क्षेत्रातील आशा कार्यकर्ती म्हणून कर्तव्य केलेल्या महिला व अशा परिस्थितीत सेवा देणाऱ्या लोकांना चहानाष्टा,जेवण पुरविणाऱ्या महिला अशा सुमारे २५ महिलांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र व तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.


  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वेगळं क्षेत्र निवडणाऱ्या मेकअप आर्टिस्ट गिता दराडे व ज्यांचे सध्या २५ महिला बचत गट कार्यरत आहेत अशा संगीता आव्हाड ह्या उपस्थित होत्या.  त्यांनी  उपस्थित महिलांना योग्य व सखोल मार्गदर्शन केले व या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.  अध्यक्ष लता पालवे यांनी सर्व उपस्थित महिलांचे आभार मानून वंजारी समाजातील महिलांना आर्थिक दृष्ट्या बळ मिळावे आणि महिलांनी स्वतःचा उद्योग,व्यवसाय,सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या कुटुंबाला आर्थकदृष्टया हातभार लावावा म्हणून बांधिलकी महिला बचत गट स्थापन केल्याचे जाहीर केले.


या वेळी उपस्थित महिलांसाठी वंदना सानप यांनी लकी ड्रॉ चे आयोजन करून विजयी महिलांना भेटवस्तू दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष वंदना सानप, सचिव यशोदा आव्हाड, खजिनदार जयश्री दौंड तसेच मनीषा घुगे, प्रेरणा काकड, अश्विनी डोमाडे सविता घुगे व रेश्मा घुगे यांचे सहकार्य लाभले.


Post a Comment

0 Comments